उदगीरात 4 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन

Protest on behalf of NCP on September 4 in Udgir

उदगीर, 3 सप्टेंबर | मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी शांततेत आंदोलन करणाऱ्या आंदोलकावर पोलीस प्रशासनाकडून अमानुष लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेचा निषेध करत लाठीचार्ज करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करण्यात यावे.

या मागणीसोबतच उदगीर विधानसभा मतदारसंघ सध्या दुष्काळाच्या संकटात सापडला आहे. शासनाने तातडीने दुष्काळ जाहीर करावा, तसेच या दुष्काळी परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे. 100 टक्के पिक विमा मंजूर करावा, शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी, यासह विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने (शरद पवार गट) 4 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात धरणे आंदोलन सुरू करण्यात येणार आहे.

दगीर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, युवक राष्ट्रवादी काँग्रेस, महिला आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी, पक्षाचे सर्व सेलचे पदाधिकारी, नगरसेवक, पंचायत समितीचे सदस्य, जिल्हा परिषद सदस्य या सर्वांनीच उपस्थित रहावे; असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाचे) तालुकाध्यक्ष प्रा.डॉ. शिवाजी मुळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उदगीर शहरचे कार्याध्यक्ष गजानन सताळकर यांनी आवाहन केले आहे.

Read More 

Farmer Pray for Rain | शेतकऱ्यांचे आभाळाकडे डोळे, राज्यावर दुष्काळाचे सावट, विमा लागू करण्याची मागणी