राधासाई दांडीया महोत्सवाचे ना. बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन

उदगीर : शहरामध्ये दुधिया हनुमान मंदिर शेजारी दूध डेअरी परिसरात दि.20 ते 23 ऑक्टोबर दरम्यान राधासाई दांडीया महोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे युवक कल्याण व क्रीडा मंत्री ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते शुक्रवारी संपन्न झाले.

यावेळी अँड. व्यंकटराव बेद्रे, सिद्धेश्वर पाटील, भरत चामले, मनोज पुदाले, शेख समीर, बाळासाहेब मरलापल्ले, मीना गायके पाटील, उदय मुंडकर यांच्या सह राधासाई दांडीया महोत्सव समितीचे, बाळासाहेब पाटोदे,अभिजित औटे.शाम ठाकूर, सतिश पाटील, प्रशिक्षक सुनिल कोळी, श्रध्दा कोळी तसेच उत्तरा कलबुर्गे, दिपाली औटे, चारुशिला पाटील, संगीता पाटील, शुभांगी वट्टमवार, डॉ. सुलोचना येरोळकर, डॉ. शितल जाधव, मोहिनी आचवले, सुप्रिया हिंगणे, स्वाती गुरडे, पल्लवी मुक्कावार, निलीमा पारसेवार, अनिता कवठाळे, अनिता जगताप, जयश्री हिंगणे, मानसी चन्नावार, संगीता नेत्रगावे, चंचला हुगे, नीता मोरे, प्रीती मुक्कावार, अश्विनी मानकरी, स्नेहा चणगे, मधुमती कनशेट्टे, मंदाकिनी जीवने, अनिता नेमताबादे, स्वाती वट्टमवार, लक्ष्मी बिरादार, वर्षा मुस्कावाड, कविता डोंगरगे, सोनाली आचमाले .राहुल आतनुरे. नानेश्वर.बिरादार. सुजाता कोनाळे सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी महिला व युवती स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.