गायीला फावड्याने जबर मारहाण; कुवारबावमध्ये तणाव, मोठा पोलिस बंदोबस्त तैनात

Ratnagiri : Beating cow violently with shovel; Tension in Kuwarbav police force deployed

रत्नागिरी : रत्नागिरी महामार्गाच्या रुंदीकरणादरम्यान अर्धवट गाळ्यात बसलेल्या एका गायीला फावड्याने मारून गंभीर जखमी केल्याने कुवारबाव येथील जमाव संतप्त झाला. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. गायीवर उपचार करण्यात आले.

यानंतर पोलिसांनी घराला कुलूप लावून लपून बसलेल्या संशयिताला अटक केली. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस बंदोबस्त मागवण्यात आला. हल्ल्यात वापरलेले फावडेही पोलिसांनी जप्त केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहराजवळील कुवारबाव येथे रस्ता रुंदीकरणासाठी वापरण्यात आलेल्या अर्धवट तुटलेल्या गाळ्यावर एक गाय बसली होती. हे गाळे अनिल अर्जुन वाडकर (वय 48, रा. कुवारबाव) यांच्या मालकीचे आहेत. दुपारी त्याने रागाच्या भरात गाळ्यात बसलेल्या गायीला फावड्याने मारहाण केली. अत्यंत क्रूर मारहाणीत गायीचा मणका तुटला आहे.

Assembly Election 2023 | निवडणूक आयोगाकडून मध्य प्रदेश, राजस्थानसह 5 राज्यांच्या निवडणुका जाहीर; पहा पूर्ण वेळापत्रक

गायीच्या पोटावर देखील गंभीर जखमा आहेत. हा अत्याचार पाहिल्यानंतर कुवारबाव बाजारात मोठा जमाव जमू लागला. पोलिसांना याची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विनीत चौधरी, शहर निरीक्षक शैलेश सणस, सहाय्यक पोलीस निरीक्षक साळुंखे, ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भोसले व एसआरपीची ताफा पाचारण करण्यात आला.

यामध्ये प्राणीमित्रांनी पुढाकार घेत गाईला तातडीने उपचारासाठी नेले. तेथे तिच्यावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार केले. तिला उभे करण्याचा प्रयत्न केला. संशयित वाडकर यांच्या कृतीचा सर्वांनी निषेध केला. रोहन मयेकर याने शहर पोलिस ठाण्यात प्राण्यांवर क्रूरतेच्या कलमाखाली फिर्याद दिली असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी विनीत चौधरी व शहर पोलिस निरीक्षक शैलेश सणस यांनी दिली.

फावड्यावर रक्ताचे डाग

पोलिसांनी संशयिताची चौकशी सुरू केली असता, त्याच्या घराला एक नव्हे तर पाच कुलूप होते. पोलिसांनी कुलूप तोडून संशयिताला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गायीला वार करणारा फावडाही जप्त करण्यात आला. संशयिताने ते धुतले होते. मात्र त्यावर काही ठिकाणी रक्ताचे डाग असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Read More 

Crime News | पतीच्या हत्येप्रकरणी पत्नीला फाशीची शिक्षा, प्रियकरालाही जन्मठेप, जाणून घ्या प्रकरण