बाबासाहेब पुरंदरेंचा पुतळा लवकरात लवकर हटवा : संभाजी ब्रिगेडचा प्रशासनाला इशारा

statue of Shivshahir Babasaheb Purandare

पुणे, 27 ऑगस्ट | पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याशेजारी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा पुतळा बसवण्यात आला आहे. त्यामुळे आता संभाजी ब्रिगेड संघटना आक्रमक झाली आहे. शिवाजी महाराजांच्या शेजारी असलेला बाबासाहेब पुरंदरे यांचा पुतळा लवकरात लवकर हटवावा.

संभाजी ब्रिगेड हे कदापि सहन करणार नाही, असा कडक इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संतोष शिंदे यांनी प्रशासनाला दिला आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संतोष शिंदे यांनीही पालिका प्रशासनाने याप्रकरणी तातडीने कारवाई न केल्यास भविष्यात संभाजी ब्रिगेड आपल्या पद्धतीने धडा शिकवेल, असा गर्भित इशाराही दिला आहे.

हे शिल्प साकारणाऱ्या व्यक्तीवर महापालिकेने गुन्हा दाखल करावा. तसेच महापालिकेने परवानगी दिल्याप्रकरणी बालगंधर्वच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करावा, अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे, असे ब्रिगेडचे प्रवक्ते संतोष शिंदे यांनी सांगितले.

Read More

पंचनामा : आगामी निवडणुकांत ‘इगो’ बाजूला सारून लढावे लागेल