आरक्षण कोर्टात टिकणारच, जरांगेंची भाषा राजकीय वाटतेय : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Chief Minister Eknath Shinde

मुंबई : मराठा समाजाला आमच्या सरकारने दिलेले 10 टक्के आरक्षण न्यायालयात टिकेल, ते टिकवून ठेवण्याची जबाबदारी सरकारची आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केले. तसेच न्यायालयात आरक्षण टिकवण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, त्यामुळे कोणीही कायदा हातात घेऊन संयम बाळगू नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांना केले आहे.

दरम्यान, आतापर्यंत ओबीसी समाज मराठाच असेल, असे निर्णयही राज्य सरकारने घेतलेले नाहीत. त्यामुळे कोणीही संभ्रम पसरवू नये आणि त्यातून सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करू नये, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांवर टीका केली. तसेच जरंगे-पाटील हे सकारात्मक भावनेने मराठा समाजासाठी लढा देत असून राज्य सरकारही आरक्षणाच्या मुद्द्यावर सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.