सचिन तेंडुलकर यांना ऑनलाईन गेमची जाहिरात अंगलट येणार? बच्चू कडू आक्रमक

Sachin Tendulkar-Bachhu Kadu

Online Game Advertisement by Sachin Tendulkar | भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी एका ऑनलाइन गेमला प्रोत्साहन देणारी जाहिरात केली आहे. या जाहिरातीचा फटका सचिन तेंडुलकर यांना बसण्याची शक्यता आहे.

सचिन तेंडुलकर भारतरत्न आहेत. एवढ्या मोठ्या माणसाला कोणती जाहिरात करायची आणि कोणती करायची नाही याची जाणीव असायला हवी. मात्र सचिनने ही काळजी घेतली नाही. ऑनलाइन गेमची जाहिरात केली. त्यामुळे संतप्त झालेल्या आमदार बच्चू कडू यांनी कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. सचिन तेंडुलकरला लवकरच आपल्या वकिलामार्फत नोटीस बजावणार असल्याची घोषणा आमदार बच्चू कडू यांनी केली.

बाबासाहेब पुरंदरेंचा पुतळा लवकरात लवकर हटवा : संभाजी ब्रिगेडचा प्रशासनाला इशारा

सचिन तेंडुलकरने ऑनलाइन गेमला प्रोत्साहन दिले आहे. याप्रकरणी राज्य सरकारने सचिन तेंडुलकरला नोटीस पाठवून जाब विचारावा. सचिन तेंडुलकर भारतरत्न आहे. भारतरत्न असलेल्या व्यक्तीने ऑनलाइन गेमला प्रोत्साहन देणे योग्य नाही. हे चुकीचे आहे. त्यामुळे सचिनला नोटीस पाठवून त्याचा जाब विचारण्यात यावा, अशी मागणी करतानाच राज्य सरकारने ऑनलाइन गेमवर बंदी घालावी, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे, ते पत्रकारांशी संवाद साधत होते.

आमदार बच्चू कडू म्हणाले, भारतरत्न सचिन तेंडुलकर ऑनलाइन गेमची जाहिरात करतो. त्यामुळे तरुण पिढी अशा खेळांकडे आकर्षित होत आहे. पैशासाठी जाहिरात करणे शक्य नाही. अशा जाहिराती करू नयेत, अशी विनंती आम्ही त्यांना आधीच केली आहे. कडू यांनीही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा तरुणांवर प्रभाव असल्याचे स्पष्ट केले.

सचिन तेंडुलकर यांनी आपल्याला कोणताही अभिप्राय दिलेला नाही, असे ते म्हणाले. त्यामुळे त्यांना 30 तारखेला कायदेशीर नोटीस बजावण्यात येणार आहे. आमच्या वकिलांनी यासंदर्भात एक मसुदा तयार केला आहे. त्यानंतरही आंदोलनाकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलनाची दिशा ठरवली जाईल, असेही बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.