शरद पवार यांचा मोठा निर्णय : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी रोहिणी खडसे

Sharad Pawar - Rohini Khadse - Eknath Khadse

जळगाव, 29 ऑगस्ट | पक्षात फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीने संघटनात्मक बदल सुरू केले आहेत. शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसने महिला प्रदेशाध्यक्षपदी विद्या चव्हाण यांच्या जागी रोहिणी खडसे यांना संधी दिली आहे. दुसरीकडे नुकतेच पक्षात दाखल झालेले परळीचे नेते बबनराव गिते यांची प्रदेश उपाध्यक्षपदी बढती करण्यात आली आहे.

रोहिणी खडसे यांच्याकडे जबाबदारी देऊन राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेतृत्वाने मोठी खेळी केल्याचे बोलले जात आहे. रोहिणी खडसे – खेवलकर या माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांच्या कन्या असून त्या उच्चशिक्षित आहेत. त्यांचे शिक्षण वकिली क्षेत्रातील एल. एल. बी., एल. एल. एम. पर्यंत झाले आहे.

2019 मध्ये भाजपने एकनाथ खडसे यांची उमेदवारी नाकारली होती, त्यावेळी खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांनी पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवली होती, ज्यात त्यांचा अल्प फरकाने पराभव झाला होता. त्यानंतर एकनाथ खडसे यांच्यासोबत रोहिणी खडसे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

रोहिणी खडसे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक शिक्षण आणि विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माजी अध्यक्षा आणि विद्यमान संचालक आहेत. रोहिणी खडसे यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक लेखापरीक्षणात ‘क’ वरून ‘अ’ वर गेली.

बँकेचे संगणकीकरण, एटीएम सेवा त्यांच्या कार्यकाळात सुरू झाली. त्यांच्या कार्यकाळात बँकेने पुढाकार घेऊन विविध क्षेत्रात पुरस्कार मिळवले. आदिशक्ती या मुक्ताईनगर येथील मुक्ताई सहकारी सूत गिरणीच्या अध्यक्षा असून त्यांनी एकनाथ खडसे यांनी स्थापन केलेली सूतगिरणी सुरू करून स्थानिक महिला व तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे, परंतु ती काही कारणांमुळे अपूर्ण होती.

राम मंदिर उद्घाटनावेळी धर्मांधतेचा आगडोंब उसळेल : संजय राऊतांचा गंभीर आरोप

रोहिणी खडसे या महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा आहेत. त्या मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी मुक्ताईनगर या मुक्ताईनगर भागातील प्रमुख शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षाही आहेत. या संस्थेअंतर्गत बालवाडी ते पदव्युत्तर शिक्षण दिले जाते.

रोहिणी खडसे या जळगाव जिल्हा शैक्षणिक संस्था चालक संघटनेच्या कार्याध्यक्षा आहेत. रोहिणी खडसे या अखिल भारतीय नाट्य परिषद, मुंबईच्या नियामक मंडळाच्या माजी सदस्या आहेत आणि अखिल भारतीय नाट्य परिषद, जळगाव शाखेच्या अध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत. मुक्ताईनगर परिसरातील सामाजिक व धार्मिक कार्यात त्यांचा सहभाग असतो.

भारतीय जनता पक्षात असताना त्यांनी जिल्हा सरचिटणीसपदाची जबाबदारी सांभाळली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर रोहिणी खडसे मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विस्तार करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत.

त्यांनी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी जनसंवाद यात्रा काढली होती. राज्यात प्रथमच मुक्ताईनगर मतदार संघात रोहिणी खडसे यांनी जनसंवाद यात्रा काढली, त्याचे ज्येष्ठ नेत्यांसह जळगाव जिल्ह्यात आलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भरभरून कौतुक केले.

तसेच अन्य जिल्ह्यातही अशाच पद्धतीने जनसंवाद यात्रा काढण्याचे आदेश पदाधिकाऱ्यांना देण्यात आले. यात्रेदरम्यान त्यांनी मुक्ताईनगर मतदारसंघातील 182 गावांना भेटी देऊन ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या व त्या सोडविण्याचा प्रयत्न केला.

कापूस, केळी, कांदा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी काढलेले निषेध मोर्चे लक्षवेधी ठरले. त्यांनी महिला अत्याचाराविरोधात मूक मोर्चा काढला, त्यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

गेल्या महिन्यात रोहिणी खडसे जळगाव दौऱ्यावर असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. याशिवाय महिला सक्षमीकरणासाठी पक्षाची विविध आंदोलने, बैठका, कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असतो.

Read More 

Maharashtra Drought | महाराष्ट्र सरकार अ‍ॅक्शन मोडवर, दुष्काळ निवारणासाठी मंत्रालयात उभारले ‘वॉर रूम’