तामिळनाडूच्या धर्तीवर महाराष्ट्रात ७० टक्के आरक्षण द्या : शरद पवार

Sharad Pawar to give 70% permanent reservation on the lines of Tamil Nadu State Maharashtra Govt

पुणे (राजगुरुनगर) : तामिळनाडू राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात 70 टक्के कायमस्वरूपी आरक्षण देणे, कंत्राटी पद्धतीने तहसीलदार नेमणे हा सरकारचा मूर्खपणा असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांनी राजगुरुनगर येथे केली.

राजगुरुनगर येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बेमुदत साखळी उपोषण सुरु आहे. तिथे शरद पवार यांनी भेट दिली. त्यांच्यासमवेत खासदार डॉ.अमोल कोल्हे, राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे देवदत्त निकम, खेड तालुकाध्यक्ष हिरामण सातकर, बाबा राक्षे आदी उपस्थित होते.

खासदार पवार पुढे म्हणाले, तामिळनाडू राज्य सरकारने दिलेले वाढीव आरक्षण न्यायालयात टिकून आहे. महाराष्ट्रात 50 वरून 65 ते 65 टक्के आरक्षण वाढल्यास सध्याची परिस्थिती बदलू शकते. सरकारला ते जमत नसेल तर आम्ही सल्ला देऊ, असा खडा इशारा ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार यांनी राज्य सरकारला दिला.

याशिवाय शिंदे, फडणवीस आणि अजित पवार या तिन्ही पक्षांच्या सरकारवर टीका करताना खासदार शरद पवार म्हणाले, जळगावात कंत्राटी पद्धतीने तहसीलदार नियुक्ती हा सरकारचा मूर्खपणा आहे. उद्या अशा अधिकाऱ्याने चुकीचा निर्णय घेऊन रेकॉर्ड तयार करून निर्णय देऊन निघून गेल्यास जो गोंधळ होईल, त्याची जाबाबदारी सरकार घेणार आहे का? असा सवाल देखील पवार यांनी केला.