धक्कादायक : बलात्कारानंतर नग्न अवस्थेत तरुणीचा मदतीसाठी आक्रोश; लोकांनी वेडी समजून केले दुर्लक्ष

People ignored

भिलवाडा, 10 सप्टेंबर | राजस्थानमधील भिलवाडा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका तरुणीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केला. पिडीत तरुणी जेवल्यानंतर शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडल्यावर आरोपींनी अपहरण केले आणि त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तरुणीवर अत्याचार करून नराधम थांबले नाहीत, तर आरोपींनी जाताना पीडितेचे कपडेही काढून घेतले. ही महिला विवस्त्र अवस्थेत रस्त्यावर लोकांकडे मदतीसाठी विचारत असताना लोकांनी तिची अवस्था पाहून तिला वेडी समजून पळून जाऊ लागले.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गंगापूर ठाणे परिसरात घडली आहे. शनिवारी रात्री जेवल्यानंतर युवती शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडली होती. यावेळी तीन तरुणांनी तिचे अपहरण करून तिला गाडीत टाकले. यानंतर आरोपीनी महिलेवर आळीपाळीने बलात्कार केला. यानंतर तिन्ही आरोपी महिलेला नग्न अवस्थेत सोडून तिचे कपडे घेऊन घटनास्थळावरून फरार झाले. आरोपींनी कपडे काढून घेतले असता तरुणी विवस्त्र अवस्थेत लोकांकडे मदतीसाठी याचना करत होती. मात्र तरुणीची अवस्था पाहून लोकांनी तिला वेडी समजून तिथून निघून गेले. अखेर काही ग्रामस्थांनी पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली.

सीट कव्हरने शरीर झाकले

दरम्यान, एका व्यक्तीने तिचा आवाज ऐकून पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी प्रथम तिचे शरीर जीपच्या सीट कव्हरने झाकून टाकले. यानंतर पोलिसांनी तिला स्टेशनवर नेले. पोलिस ठाण्यात गेल्यानंतर महिलेला पोलिस कर्मचाऱ्यांनी कपडे दिले. त्यानंतर तिला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले.

पोलिसांना घटनास्थळी तुटलेल्या बांगड्या सापडल्या

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन भिलवाड्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक विमल सिंह नेहरा हेही गंगापूरमध्ये दाखल झाले. ज्यांच्याकडे सध्या भिलवाडा पोलीस अधीक्षकपदाचा कार्यभार आहे. पोलिसांना घटनास्थळी काही आक्षेपार्ह वस्तू सापडल्या आहेत. या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. अपहरण करताना आरोपी दारूच्या नशेत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Crime News | पाचवीच्या विद्यार्थिनीवर ६८ वर्षीय व्यक्तीकडून महिनाभर बलात्कार, आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आहेत. तसेच पोलिसांना घटनास्थळी तुटलेल्या बांगड्या सापडल्या आहेत. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्याबाहेर लोक जमा झाले. यावेळी त्यांनी आरोपींना कठोर शिक्षा करून युवतीला न्याय देण्याची मागणी केली. पीडितेची सध्या वैद्यकीय तपासणी सुरू आहे. दरम्यान, आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.

Read More 

Maratha Morcha : मनोज जरांगेंची ताकद ओळखण्यात पोलिसांची गुप्तचर यंत्रणा फेल, मराठा आंदोलन कसे पेटले? प्रशासन नेमके कुठे चुकले?