सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक श्रीकांत पाटील यांचा काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश

उदगीर : येथील सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक श्रीकांत पाटील यांनी आज माजी मंत्री आ.विलासरावजी देशमुख साहेब यांच्या उपस्थितीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे.

आज बाबळगाव येथे उदगीर तालुक्यातील सर्व पक्ष प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रमुख कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत लोकनेते अमित विलासराव देशमुख साहेब यांच्या हस्ते श्रीकांत पाटील यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर श्रीकांत पाटील यांच्या पक्ष प्रवेशाने चंदरअण्णा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचा पक्षाला मोठा फायदा होणार असल्याची प्रतिक्रिया तालुकाध्यक्ष कल्याण पाटील यांनी व्यक्त केली.

सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक श्रीकांत पाटील यांचा काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश

त्यांना काँग्रेस पक्षाचे संघटन वाढवणे व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी हुडे, काँग्रेस पक्षाचे उदगीर तालुकाध्यक्ष कल्याणराव पाटील साहेब, सौ. उषाताई कांबळे, बाजार समिती उपसभापती प्रीतीताई भोसले, एडवोकेट पद्माकर उगिले, मंजूरखान पठाण, राजकुमार भालेराव, महबूब शेख, मधुकर एकुर्केकर, संतोष बिरादार आदी मान्यवर उपस्थित होते.