वर्गात फलकावर ‘जय श्री राम’ लिहिल्याने विद्यार्थ्याला मारहाण, शिक्षकाला अटक

Student beaten up, teacher arrested for writing 'Jai Shri Ram' on board in class

कठुआ (जम्मू-काश्मीर) 27 ऑगस्ट | उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधील एका शाळेत शिक्षकाने वर्गातील विद्यार्थ्याकडून मुस्लिम विद्यार्थ्याला मारहाण करायला लावली. संबंधित घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. हे प्रकरण ताजे असतानाच आता जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत शिक्षकाने विद्यार्थ्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

संबंधित विद्यार्थ्याने वर्गात फलकावर ‘जय श्री राम’ लिहिल्याने ही मारहाण झाल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकासह आरोपी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी शनिवारी आरोपी शिक्षकाला अटक केली. मुख्याध्यापक फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Big Update | अखेर एकदाचे ठरले, ‘इंडिया’ आघाडीच्या पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण? महत्त्वाची अपडेट

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, पोलिसांनी भारतीय कलम 323 (स्वैच्छिकपणे दुखापत करणे), 342 (चुकीने बंदिस्त करणे), 504 (हेतूपूर्वक अपमान), 506 (धमकावणे) आणि कलम 75 (मुलांवर क्रूरता) अंतर्गत शिक्षकावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.

कठुआमधील या घटनेनंतर उपायुक्तांनी या घटनेच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. याबाबतची माहिती खुद्द उपायुक्तांनी अधिसूचना काढून दिली आहे. या समितीमध्ये बानीचे उपविभागीय दंडाधिकारी, कठुआचे उपशिक्षणाधिकारी आणि खरोटे येथील सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य यांचा समावेश आहे.

Read More 

मला लोकांचे चेहरे वाचता येतात; राज्यातील जनतेला भाजपची सत्ता नकोय : शरद पवार