बारामती लोकसभेत नणंद-भावजय येणार आमने सामने? काय म्हणाल्या सुप्रीया सुळे

काय म्हणाल्या सुप्रीया सुळे

Baramati Loksabha 2024 : बारामती लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे लोकसभेची तयारी करत असून यंदा ‘नणंद भावजय’ यांच्यातच लढत होण्याची दाट शक्यता आहे.

यावर खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी गेली 15 वर्षे इथली खासदार असून मी मतदारसंघाचा दौराही केला आहे. पुण्यात आज कालवा समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही आढावा बैठक सुरू आहे. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी त्या बोलत होत्या.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी गेल्या 15 वर्षांपासून या मतदारसंघाची लोकप्रतिनिधी आहे. मला मतदारसंघात फिरणे म्हणजे कुटुंबात वावरण्यासारखे वाटते. माझ्याशी मतदार संघातील लोकांशी वैयक्तिक प्रेमाचे नाते आहे. मी 2007 पासून या मतदारसंघात फिरत आहे. मला फिरण्याचा अधिकार आहे. कारण हा माझा मतदारसंघाचं नाही तर परिवार आहे.

या बैठकीला शरद पवार गटातील अनेक नेते उपस्थित 

शरद पवारांचा गट आणि अजित पवारांचा गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडल्यानंतर या बैठकीला शरद पवारांचे प्रमुख नेते माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार हेही उपस्थित होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या कालवा समितीच्या बैठकीत मोठा राजकीय कार्यक्रम होणार का, अशी चर्चा आहे.

कारण शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावान असलेले राजेश टोपे यांनीही अजित पवारांची भेट घेतली आहे. शरद पवार दिवाळीत एकत्र जेवणासाठी अजित पवारांच्या घरी गेले तेव्हा राजेश टोपेही शरद पवार यांच्यासोबत गेले. त्यामुळे यावर काही राजकीय चर्चा सुरू असून महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप होणार का, अशी चर्चा सुरू आहे.