पंकजा मुंडेंना राजकीय जीवनदान, समर्थकांकडून आर्थिक मदतीसोबत सहानुभूतीचा महापूर

पंकजा मुंडें

Pankaja Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या मालकीच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला जीएसटी विभागाने नोटीस पाठवली आहे. पंकजा मुंडे यांच्या कारखान्याला 19 कोटींच्या थकबाकीची नोटीस बजावण्यात आली आहे. राज्यातून 8-9 कारखाने केंद्राकडे मदतीसाठी गेले होते. मात्र पंकजा मुंडे यांचा कारखाना सोडला तर इतरांना मदत दिल्याची खंत व्यक्त केली होती आणि तिथून वातावरण तापू लागले.

पंकजा मुंडे यांना पाठवलेल्या नोटीसमुळे मुंडे समर्थकांनी कारखाना वाचविण्यासाठी आणि पंकजा मुंडे यांना बळ देण्यासाठी पैसे गोळा करण्यास सुरुवात केली. पंकजा मुंडे यांचे समर्थक त्यांच्या पाठीशी तन मन धनाने ठामपणे उभे असल्याचे चित्र मागच्या 2 दिवसात दिसून येत आहे. गोपीनाथ मुंडेंनी उभारलेला कारखाना वाचवण्यासाठी पंकजा मुंडे यांच्या मागे गट आणि पक्ष विसरून सर्व कार्यकर्ते एकत्र आले आहेत.

पंकजा मुंडे समर्थकांच्या नावाखाली सर्व कार्यकर्ते गटबाजी आणि पक्ष विसरून पंकजा मुंडे यांच्या मागे ठामपणे उभे आहेत. त्यातच जाणीवपूर्वक पंकजा मुंडे यांनाच केंद्राकडून मदत नाकारण्यात आल्याचा संदेश कार्यकर्त्यांपर्यंत गेला आहे आणि त्यामुळे पंकजांनाही सहानुभूतीचा फायदा होत आहे. मुंडे समर्थकांकडून एक हजारपासून ते लाखो रुपयांपर्यंत मदत दिली जात आहे. सोशल मीडियावर मोहीम देखील मदतीचे आवाहन करणारे मेसेज फिरत आहेत. फेसबुक आणि व्हाट्सअप ग्रुपवर मदतीचे मॅसेज फिरवले जात आहेत.

पंकजा मुंडे सध्या राजकीय आणि आर्थिक अडचणीत सापडल्याने मुंडे समर्थक एकवटल्याचे दिसत आहे. वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना वाचवण्यासाठी मुंडे समर्थक आणि उत्साही कार्यकर्त्यांनी लोकवर्गणी गोळा करण्यास सुरुवात केली आणि बघता बघता दोन दिवसात पाच कोटी रुपये जमा झाले आहेत. हा आकडा रोजच्या रोज वाढत आहे, मदतीचा हा ओघ वाढतच आहे. सोशल मीडियावरही मदतीचे पोस्ट फिरत आहेत, कार्यकर्ते चेकचे फोटो पोस्ट करीत आहेत.

शिवशक्ती जागर यात्रेच्या माध्यमातून पंकजांनी तळागाळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भाजपातील काही नेत्यांचा इगो दुखावला गेला. त्याच आकसापोटी जीएसटी विभागाकडून नोटीस बजावण्यात आल्याचे म्हटले जात आहे. पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी एकजूट दाखविण्याचा संकल्प केला आहे, त्यातून राजकीय आणि आर्थिक ताकत दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

जीएसटी विभागाने केवळ नोटीस बजावल्याने पंकजा मुंडे यांच्यावर जाणीवपूर्वक अन्याय केला जात असल्याचे समर्थकांना वाटते. नोटीसमुळे सहानुभूतीचा ओघ निर्माण झाला असून एक प्रकारे पंकजा यांचा पाया मजबूत होताना दिसत आहे. जीएसटीची नोटीस पंकजा मुंडे यांना संजीवनी ठरली आहे, या माध्यमातून पंकजा मुंडे यांचे पुन्हा एकदा दमदार पुनरागमन करणार असल्याचे दिसत आहे.

म्हणून पंकजा मुंडे यांना नोटीस

पंकजा मुंडे यांना बजावलेल्या नोटीसवर अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे होती. पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्रभर फिरल्यामुळे त्यांच्यावर दबाव टाकण्यासाठी कारवाई सुरू करण्यात आल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. परळी येथील पांगरी येथे वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना असून कारखान्याच्या अध्यक्षा पंकजा मुंडे आहेत. हा कारखाना गेल्या दीड वर्षांपासून बंद आहे. या कारखान्यातील साहित्य पुरवठादार व कर्मचाऱ्यांचे वेतनही थकीत आहे.

Read More 

iPhone SE 4 मध्ये असेल iPhone 14 सारखे नवीन डिझाइन, फीचर्स लीक