पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांचा तरुणावर गोळीबार, एकाच महिन्यात तिघांची हत्या

Suspicion of police informant, Naxalites firing on youth, killing of three in one month

गडचिरोली : पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून माओवाद्यांनी आणखी एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. रामजी आत्राम (27, रा. कापेवंचा जि. अहेरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून घटनास्थळी सापडलेल्या नक्षल पत्रकात तो खबरा असल्याचा दावा करण्यात आला आहे. दक्षिण गडचिरोली परिसरात महिनाभरात माओवाद्यांनी तीन जणांची हत्या केल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे.

24 नोव्हेंबर रोजी अहेरी तालुक्यातील राजाराम खांडला पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कपेवंचा येथील रहिवासी रामजी हे त्यांच्या शेतात काम करत होते. दरम्यान, सायंकाळी पाचच्या सुमारास काही सशस्त्र माओवाद्यांनी तेथे जाऊन त्यांची गोळ्या झाडून हत्या केली.

दक्षिण गडचिरोलीत महिनाभरात माओवाद्यांनी तीन जणांची हत्या केली आहे. 15 नोव्हेंबर रोजी भामरागड तालुक्यातील पेनगुंडा येथे दिनेश गावडे, 23 नोव्हेंबर रोजी एटापल्ली तालुक्यातील टिटोला येथील माजी पोलीस पाटील लालसू वेड्डा आणि शुक्रवारी अहेरी तालुक्यातील कपेवंचा येथील रामजी आत्राम यांची हत्या झाली होती.

गेल्या दोन वर्षांपासून मोकाट असलेले नक्षलवादी पुन्हा सक्रिय होताना दिसत असून एकापाठोपाठ होणाऱ्या हत्यांमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. एकीकडे पोलिसांनी माओवाद्यांच्या विरोधात शोधमोहीम तीव्र केली असली आणि दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात पोलीस मदत केंद्रे आणि पोलीस ठाणी उभारण्याचे काम हाती घेतले असले, तरी यावरून माओवाद्यांची दहशत कायम आहे.