शरद पवारांना सोडण्यासाठी दोन बड्या नेत्यांची ऑफर; एकनाथ खडसेंचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

eknath khadse

जळगाव | राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी शरद पवारांना घट्ट पकडून राहावे. भाजपमध्ये येण्यासाठी हातपाय जोडायची गरज नाही, असे मोठे विधान भाजप नेते गिरीश महाजन यांनी केले होते. गिरीश महाजनांच्या या वक्तव्यावर एकनाथ खडसेंनी पलटवार केला आहे.

आपण भाजपमध्ये येण्याचा प्रयत्न करत नाही. याउलट अजितदादा गटातील दोन बड्या नेत्यांनी आपल्याला फोन केला होता. तर भाजपकडून बोलावले जात असल्याचा गौप्यस्फोट एकनाथ खडसेंनी केला. शरद पवार यांना सोडण्यासाठी आपल्याला फोन येत असल्याचा खळबळजनक दावा देखील एकनाथ खडसेंनी केला आहे. नाथाभाऊंच्या थेट गौप्यस्फोटाने खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे पत्रकारांशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. मी शरद पवारांचा खंबीर समर्थक आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही. मला अजित पवारांनी त्यांच्यासोबत येण्याची गळ घातली होती, असेही त्यांनी सांगितले.

तसेच आमदार अमोल मिटकरी यांनीही मला फोन करून शरद पवारांना सोडून अजितदादा गटात सामील व्हा, असे म्हटल्याचा गौप्यस्फोट करताना या दोन नेत्यांनी मला फोन केल्याचे सांगितले. परंतु मी शरद पवारांचा खंबीर समर्थक आहे. शरद पवारांची कोणत्याही परिस्थितीत साथ सोडणार नसल्याचे एकनाथ खडसे म्हणाले.

तर त्यांच्याकडे कसा जाणार?

मला राष्ट्रवादीत जाण्याची आणि भाजपमध्ये येण्याची घाई असल्याचं महाजन सांगतात. मी त्यांच्याकडे आलो किंवा गेलो हे अजितदादांनी जाहीर करावे. उलट अजितदादांनीच मला विचारले. त्याबद्दल मिटकरी मला बोलले आहेत. त्यामुळे भाजपचे लोकही मला भाजपमध्ये येण्याचा आग्रह धरतात. चंद्रशेखर बावनकुळे यांनी मला खुलेआम निमंत्रण देऊनही मी त्यांच्याकडे गेलो नाही. मी भाजपमध्ये गेलो नाही तर अजित पवारांकडे कसा जाणार? असा सवाल त्यांनी केला.

मी हांजीहांजी करत नाही

मी सत्तेसाठी लाचार नाही, कोणाची हांजी हांजी करत नाही, करणार नाही. मी कोणाच्या मागे उभं राहून फोटो काढणारी व्यक्ती नाही. मी संकट मोचक, मीच संकट मोचक आहे असे सांगत फिरणारा मी नाही. स्वाभिमानाने जगलोय. स्वाभिमानाने जगेन. सत्तेत यायचे असते तर ते कधीच गेलो नसतो, असे सांगत नाथाभाऊंनी गिरीश महाजन यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.

फोटोंसाठी धडपडत नाही

मला स्वतःला सर्वकाही हवे असते तर मी गिरीश महाजन यांना पुढे आणले नसते. त्यांना कायमचे मागे ढकलले असते. पण ते माझ्या तत्त्वात बसत नाही. तुम्हाला माहिती आहे, मी कोणाचीही पाठराखण करत नाही. फोटोंसाठी धडपडत नाही. मला त्याची काहीही गरज नाही, असा हल्ला थेट महाजन यांच्यावर हल्ला चढवला.

Read More 

कमलनाथ यांचा शिवराज सरकारवर जोरदार हल्ला, म्हणाले – जनता तुमच्या दुहेरी खोटारडे पणावर नाराज