UCO बँकेने दिला झटका, वाढवले कर्जाचे दर, भरावा लागणार जास्त EMI

UCO Bank strikes, increased loan rates, higher EMIs to be paid

UCO Bank | सार्वजनिक क्षेत्रातील UCO बँकेने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. वास्तविक, UCO बँकेने मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) आणि ट्रेझरी बिल लिंक्ड लेंडिंग रेट (TBLR) मध्ये सर्व कालावधीसाठी 0.5 टक्के वाढ केली आहे. आता बँकेकडून कर्ज घेणे महाग होणार आहे. बँकेचे नवीन दर 10 सप्टेंबर 2023 पासून लागू होतील.

MCLR आणि TBLR मध्ये वाढ झाल्याने बँकेकडून कर्ज घेणे महाग होऊ शकते. आता तुम्हाला कर्ज घेताना पूर्वीपेक्षा जास्त ईएमआय भरावा लागेल. याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर होणार आहे.

UCO बँक MCLR दर

UCO बँकेने रात्रीचा MCLR दर 7.90 टक्क्यांवरून 7.95 टक्के केला आहे. एक महिन्याचा MCLR 8.10 टक्क्यांवरून 8.15 टक्के करण्यात आला आहे. 3 महिन्यांसाठी MCLR 8.25 टक्क्यांवरून 8.30 टक्के करण्यात आला आहे. 6 महिन्यांचा MCLR 8.50 टक्क्यांवरून 8.55 टक्के आणि 1 वर्षाचा MCLR 8.65 टक्क्यांवरून 8.70 टक्के करण्यात आला आहे. नवीन व्याजदर 10 सप्टेंबरपासून लागू होणार आहेत.