खोकेवाल्यांची लंका दहन करणारा धगधगता निखारा माझ्याकडे; उद्धव ठाकरेंचा दसरा मेळाव्यात हल्लाबोल

Uddhav Thackeray strongly criticizes Shinde group in Dussehra Mela

दसरा मेळावा 2023 | शिवसेनेच्या ठाकरे गटाचा दसरा मेळावा मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कवर झाली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे म्हणणे ऐकण्यासाठी राज्यभरातील शिवसैनिकांनी हजेरी लावली होती. राज्यभरातील नागरिकांचे लक्ष लागलेल्या ठाकरे गटाच्या मेळाव्यात शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. खोक्यांची लंका जाळण्यासाठी माझ्याकडे धगधगता निखारा आहे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर टीका केली.

उद्धव ठाकरे भाषणाच्या सुरुवातीला म्हणाले, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि मातांनो, 57 वर्षे झाली, आपण शिव तीर्थावर एकत्र येतोय, ही परंपरा थांबू दिली नाही. यामध्ये मोडता घालण्याचा प्रयत्न झाला, पण त्यांना मोडीत काढून परंपरा चालू ठेवली आहे. पुढची अनेक वर्षे सुरूच ठेवणार आहोत. सर्वप्रथम दसऱ्याच्या शुभेच्छा. हा मेळावा या संस्कृतीचे विराट दर्शन आहे. आपण खोकासुरांचे दहन करणार आहोत. रामाने रावणाचा वध केला. रावण सुद्धा शिवभक्त होता पण तो शिवभक्त असूनही रामाला त्याचा वध करावा लागला, कारण रावण माजला होता.

आमच्या शिवसेनेला पळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. भगवान श्रीरामचंद्रांनी आपल्या धनुष्यबाणांनी रावणाचा वध केला. ते धनुष्यबाणही चोरले आहे. ज्याप्रमाणे हनुमानाने रावणाची सुवर्ण लंका पेटवली. तसेच तुमची पेटी लंका जाळण्यासाठी शिवसैनिक येथे जमले आहेत. सध्या क्रिकेटचा हंगाम आहे. विश्वचषक सुरू आहे. सामन्याच्या मध्ये जाहिराती येत आहेत. काही जाहिराती पाठ होतात, कारण खूप आकर्षक असतात. सध्या एक जाहिरात अक्षय, अजय देवगण, शाहरूख खान करीत आहेत. आमच्याकडेही तिघेही बसलेत. त्यांना कमला पसंत आहे, यांनाही कमळा पसंत आहे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला टोला लगावला.

उद्धव ठाकरे यांनी जरंगे पाटील यांचे आभार मानले. धनगर समाजाला साद देऊन व सोबत घेऊन त्यांनी चांगली गोष्ट केली आहे. जालन्यात शांततेत आंदोलन सुरू होते, पण हे सध्याचे सरकार जुलमशहांचे आहे. डायरचे सरकार आहे. अंतरवली मध्ये शांततापूर्ण आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला, कारण या डायरच्या अवलादी आहेत, असेही ते म्हणाले.

जालन्याचा डायर कोण, आदेश कोणी दिला, याची चौकशी झाली नाही. जरांगे यांची भेट घेतली. त्यांनी मला बुलेटचे केसिंग दाखवले. हा प्रश्न सोडवण्याची हिम्मत असेल तर गद्दारांना सांगणे आहे, मराठा समाजाला न्याय द्या. न्याय मिळवायचा असेल तर ही मागणी व प्रश्न इथे सुटणार नाही, लोकसभेत यावर तोडगा काढावा लागेल, असेही ठाकरे पुढे म्हणाले.