दादा कुठे नाराज, दादा तर नाराजांच्या छाताडावर जाऊन बसले, ठाकरेंचा हल्लाबोल

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray : अजित पवारांची नाराजी दूर झाली की नाही माहीत नाही? त्यांची नाराजी मला तर दिसली नाही, असे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. अजित पवार चांगले काम करत होते. ते आमच्यासोबत आहेत म्हणून ज्यांच्या पोटात दुखत होते त्यांच्या छाताडावरचं अजितदादा बसले आहेत, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे-फडणवीस यांच्यावर टीका केली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही नांदेड, नागपूरला गेले नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुठेही जात नाहीत. भ्रष्टाचार खुलेआम सुरू आहे. कोणत्याही निविदा प्रक्रियेशिवाय औषध खरेदी सुरू आहे; असा व्यवहार होत असेल तर चौकशी कशी होणार, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला. रुग्णालयात एवढे मृत्यू होत असतील तर आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.