निवडणुका येऊ द्या तुमची मस्ती उतरवतो; उद्धव ठाकरे यांचा शिंदे गटावर जोरदार निशाणा

Uddhav Thackeray strongly criticizes Shinde group in Dussehra Mela

Uddhav Thackeray: कडाक्याच्या थंडीत ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ठाण्यात हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुंब्रा येथील शाखेत जाण्यापासून पोलिसांनी रोखले. सरकारला सत्तेचा माज, निवडणुका येऊ द्या तुमची मस्ती उतरवतो अशा शब्दात  उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला  इशारा आहे.

पोलिसांनी उद्धव ठाकरेंना रोखले

मुंब्रा शिवसेना शाखेजवळ शनिवारी जोरदार राजकीय नाट्य पाहायला मिळाले. शिवसेना शिंदे गटाने पाडलेल्या मुंब्रा शाखेला भेट देण्यासाठी उद्धव ठाकरे तेथे आले होते. मात्र शिवसेना शाखेत पोहोचण्यापूर्वीच त्यांचा ताफा पोलिसांनी अडवला. उद्धव ठाकरे स्वतः गाडीतून बाहेर आले आणि त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्तेही रस्त्यावर जमा झाले. ठाकरे यांना काळे झेंडे दाखवले. मुंब्य्रातील रस्त्यांवर अर्धा तास हे नाट्य सुरू होते. अखेर उद्धव ठाकरे शाखेत न जाता परतले.

उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर जोरदार निशाणा

उद्धव ठाकरे मुंब्रा येथे पोहोचले, मात्र सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी त्यांना बॅरिकेड्स ओलांडून फांद्या पाडलेल्या भागाची पाहणी करण्यापासून रोखले. उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना पाहणी करण्यास परवानगी देण्याची विनंती केली. मात्र सुरक्षेचे कारण सांगून पोलिसांनी त्यांना बॅरिकेड्सच्या पुढे जाऊ दिले नाही. अखेर उद्धव ठाकरे दुरूनच शाखेची पाहणी करून मागे वळले. त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर निशाणा साधला.