Crime News | उत्तर प्रदेशातील तरुणाचे आई आणि मुलीशी प्रेमसंबध, एकीचा काढला काटा, पोलिसही कारण ऐकून हादरले

crime-batminama

Up Crime News : उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाचे त्याच्या मैत्रिणीसोबत आणि तिच्या आईसोबत एकाच वेळी अफेअर आहे. मात्र लग्नासाठी प्रेयसीचा दबाव वाढू लागल्याने त्याने दोघींपैकी एकीचा निवड करण्याचा निर्णय घेतला, त्याने प्रेयसीच्या आईची निवड करीत प्रेयसीचा बळी घेतलाला. हा संपूर्ण प्रकार समोर आल्यानंतर पोलीसही चक्रावले.

नेमके प्रकरण काय आहे?

उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील कॅम्पियरगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी मृतदेहाचे पोस्टमॉर्टम केले असता धक्कादायक माहिती समोर आली.

मयत तरुणीचा फाशीपूर्वीच मृत्यू झाला होता. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मुलीचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. मुलीचा गळा आवळून तिचा मृतदेह नंतर फासावर लटकवण्यात आला होता. या खून प्रकरणाचा पोलिसांनी तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली आहे.

प्रियकरानेचं केली हत्या

मृत तरुणीच्या प्रियकरानेच तिची हत्या केली होती. सुनील गौर असे आरोपीचे नाव आहे. सुनील गौर हा तिच्या मैत्रिणीच्या घरी तिला भेटण्यासाठी गेला होता. यावेळी दोघांमध्ये लग्नावरून वादावादी झाली. यानंतर सुनील गौरने रागाच्या भरात प्रेयसीची हत्या केली. यानंतर त्याने आपल्या प्रेयसीचा मृतदेह लटकवून आत्महत्या असल्याचा बनाव केला. मात्र, अखेर आरोपी पकडला गेला.

आरोपीचे मैत्रिणीच्या आईसोबतही होते प्रेमसंबंध 

आरोपीचे त्याच्या मैत्रिणीच्या आईसोबतही प्रेमसंबंध असल्याची धक्कादायक माहिती तपासादरम्यान समोर आली आहे. प्रियकरामुळे आरोपीची तिच्या आईशी ओळख झाली. आरोपीचे दोघांशी एकाच वेळी प्रेमसंबंध सुरू होते. प्रियकराचे तिच्या आईसोबत प्रेमसंबंध असल्याचे कळताच तरुणीला धक्काच बसला.

तिने प्रियकराला लग्नाचा प्रस्ताव ठेवला. यावरून दोघांमध्ये जोरदार वादविवाद झाला. रागाच्या भरात आरोपीने मुलीचाचा गळा आवळून खून केला. तपासादरम्यान आरोपीला पोलिसांनी पकडले. यावेळी त्याचे दोघांसोबत अफेअर होते. यामुळे लग्नात अडथळा आणणाऱ्या प्रेयसीची हत्या केल्याची कबुली त्याने पोलिसांसमोर दिली.