अजित पवार गटाच्या मुंबईचे ‘कारभारी’ समीर भुजबळ? उद्या होणार घोषणा?

समीर भुजबळ

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्यानंतर अजित पवार गटाने सुनील तटकरे यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आणि सेल अध्यक्षांच्या नावांची घोषणा केली. मात्र, मुंबई शहराची जबाबदारी आतापर्यंत कोणावरही देण्यात आलेली नाही. माजी मंत्री नवाब मलिक यांच्यासोबत असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून वारंवार केला जात आहे, पण मालिकांनी आपला पाठींबा कोणाला हे अजूनही जाहीर केले नाही.

नवाब मलिक यांचे नाव चर्चेत होते

राष्ट्रवादीच्या मुंबई शहर अध्यक्षपदी नवाब मलिक यांचा कार्यकाळ चांगलाच चर्चेत होता. त्यामुळे अजित पवार गटाकडून त्यांच्या नावाची अपेक्षा असल्याचे बोलले जात होते. मात्र, न्यायालयाने मलिक यांना माध्यमांशी बोलण्यास मनाई केल्याने नवाब मलिक यांचे नाव मागे राहिले आहे. शिवाजीराव नलावडे यांच्या नावाला पक्षातील अनेकांनी विरोध दर्शवल्याने समीर भुजबळ यांचे नाव पुढे आल्याचे समजते. बुधवारी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

कोण आहेत समीर भुजबळ?

समीर भुजबळ हे राष्ट्रवादीचे कट्टर समर्थक आणि अजित पवार गटाचे आमदार आणि मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे आहेत. पंकज हे भुजबळ यांचे चुलत भाऊ आहेत. समीर भुजबळ यांचा जन्म 9 ऑक्टोबर 1973 रोजी नाशिक येथे झाला. समीर भुजबळ यांनी मुंबईतून शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत सक्रिय सहभाग घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून समीर भुजबळ हे नेहमीच छगन भुजबळ यांच्यासोबत दिसतात. समीर भुजबळ 2009 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर नाशिक मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते.

छगन भुजबळ यांच्या कडून कौतुक

छगन भुजबळ आणि समीर भुजबळ हे नेहमीच राष्ट्रवादीच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर अजित पवार यांच्या गटाची पहिलीच बैठक झाली. त्यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी समीर भुजबळ यांचे कौतुक केले होते. तेव्हापासून समीर भुजबळ यांच्याकडे अजित पवार गटाची मोठी जबाबदारी येणार असल्याचे संकेत मिळत होते.

Read More

TTD Ticket Booking | तिरुपती बालाजी दर्शन ‘नोव्हेंबर व डिसेंबर’ साठी तिकिटाचे ऑनलाइन बुकिंग कसे करावे, जाणून घ्या