ही तर लाचारांची औलाद; विजय वडेट्टीवार यांची अजित पवार यांच्यावर खोचक टीका

विजय वडेट्टीवार

पुणे | भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अत्यंत कठोर शब्दांत टीका केली. ‘लबाड लांडग्याचे पिल्लू’ अशी टीका करूनही खुद्द अजित पवार काहीच बोलले नाहीत. मात्र आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही टीका करताना टोकाचे शब्द वापरले आहेत. अजित दादांनी पडळकरांना सत्तेच्या हव्यासासाठी उत्तर दिले नाही. त्यामुळे ही लाचारांची औलाद आहे, अशी विजय वडेट्टीवार यांनी खोचक टीका केली आहे.

दुसरीकडे अजित पवार यांच्या गटातील रुपाली ठोंबरे यांनी विजय वडेट्टीवार यांच्या आक्षेपार्ह टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. गोपीचंद पडळकर यांच्या विकृतीला दादांच्या कार्यकर्त्यांनी चिरडले आहे. त्यामुळे दादांबद्दल बोलण्यापेक्षा विरोधी पक्षनेत्यांनी लोकांच्या प्रश्नांवर बोलावे. नाहीतर तुमची औलाद कोण हे विचारायला मला भाग पाडू नका, असं रुपाली ठोंबरे यांनी रोखठोक उत्तर दिले.

नेमके प्रकरण काय आहे?

धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली. त्याचे पडसाद आंदोलनातूनही उमटले. मात्र खुद्द अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. आमदार पाडळकर यांनी आपल्या टीकेवरून माघार घेतली आहे. मात्र काही झाले तरी पडळकर यांच्यावतीने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माफी मागितली आहे.

अजित पवार अडीच वर्षे सत्तेत आणि वर्षभर विरोधी पक्षात होते आणि आता सत्ताधारी पक्ष विशेषत: भाजपचे आमदार अजित पवारांना खोटे लांडग्याचे पिल्लू म्हणत आहेत. म्हणजे विरोधक आणि सत्ताधारी आमदारही अजित पवारांवर निशाणा साधत आहेत.

काय म्हणाल्या रुपाली ठोंबरे?

विजय वडेट्टीवार यांनी लक्षात घ्यावे की, आम्ही तुमच्या सोबत असताना लाचारीचे औलाद आहेत असे शब्द उच्चारले नाहीत. संवैधानिक पद्धतीने सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर तुमच्या औलादीच्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. पडळकरांसारख्या विकृतांना अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी चिरडले आहे. रुपाली ठोंबरे म्हणाल्या की, अजितदादांनी पडळकरांसारख्या विकृताचा निवडणुकीत पराभव केला आहे, हे बहुतांश वडेट्टीवार विसरत आहेत.

राहिला प्रश्न पडळकरांचा अजितदादांबाबत बोलतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडळकरांचे कान उपटले आहेत. मग अजित पवारांनी काय केलं? हे विचारण्यापेक्षा तुम्ही विरोधी पक्षनेते आहात. राज्यातील प्रश्नावर काम केल्यास आपले कर्तृत्व दिसून येईल. लाचारी, औलादी हे शब्द वापरू नका, नाहीतर तुमची औलाद कोण हे विचारायला भाग पाडू नका, असे वडेट्टीवार यांनी सडेतोड उत्तर रुपाली ठोंबरे यांनी दिले.

Read More 

Ayushman Bharat Card | आयुष्मान भारत कार्ड योजनेसाठी पात्रता काय आणि अर्ज कसा करावा? जाणून घ्या