पुणे बॉम्बस्फोट प्रकरणातील वाँटेड दहशतवाद्याला दिल्लीत अटक

Wanted terrorist in Pune blast case arrested in Delhi
नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) मोस्ट वॉन्टेड दहशतवादी शाहनवाज उर्फ शफी उज्जामाला अटक केली आहे. एनआयएने शाहनवाजवर तीन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. शाहनवाज हा दिल्लीचा रहिवासी असून तो व्यवसायाने इंजिनिअर आहे. पुणे पोलिसांच्या ताब्यातून पळून तो दिल्लीत आला. तो एका मोठ्या दहशतवादी घटनेची योजना आखत होता. आता एक विशेष कक्ष त्याची चौकशी करत आहे. एनआयए अनेक दिवसांपासून त्याचा शोध घेत होती.

— ANI (@ANI) October 2, 2023

3-4 संशयित ताब्यात

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी पोलिसांना दिल्लीत इसिसचे तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे शोध सुरू होता. या कारवाईचा एक भाग म्हणून पोलिसांनी सोमवारी सकाळी शाहनवाजला अटक केली. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर स्पेशल सेलने आणखी 3-4 संशयितांना ताब्यात घेतले. दिल्लीबाहेरून एका संशयिताला पकडण्यात आले आहे. आतापर्यंत तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे.

ISIS ही दहशतवादी संघटना

ISIS अर्थातच ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया’ ही पश्चिम आशियातील दहशतवादी संघटना आहे. ही संघटना 2013 मध्ये अस्तित्वात आली. ती जगातील सर्वात भयंकर तसेच सर्वात श्रीमंत दहशतवादी संघटना मानली जाते. तिचे बजेट दोन अब्ज डॉलर्स असल्याचे सांगितले जाते. 2014 मध्ये या संघटनेने आपला नेता अबू बकर अल-बगदादी याला जगातील सर्व मुस्लिमांचा खलीफा म्हणून घोषित केले. इराक आणि सीरियाचा मोठा भाग या दहशतवादी संघटनेच्या ताब्यात असल्याचे मानले जाते. ही दहशतवादी संघटना जुन्या इस्लामिक कायद्यांवर काम करते.