जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची 'Awesome' पोस्ट पुन्हा एकदा चर्चेत  

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस कायमच त्यांच्या पोस्ट मुळे चर्चेत असतात.

सोशल मीडियावर कायमच सक्रीय असणाऱ्या बँक अधिकारी, गायिका अशी ओळख असलेल्या अमृता फडणवीस यांचा मोठा चाहता वर्ग आहे.

आज ‘जागतिक कन्या दिन’ निमित्त अमृता फडणवीस यांनी मुलीसाठी केलेलं ट्वीट पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

या फोटोमध्ये अमृता फडणवीस अन् त्यांच्या कन्येने पांढऱ्या शुभ्र रंगाचा सुरेख असा वन पीस ड्रेस परिधान केला आहे.

या ड्रेसमध्ये आई व मुलीमधील काही सुंदर क्षण टिपलेले असून ते अमृता फडणवीस यांनी शेअर केले आहेत.

अमृता फडणवीस लिहितात, “माझी मुलगीही उत्तम आहे, कारण ती म्हणजे माझं प्रतिबिंब आहे. कन्या दिनाच्या शुभेच्छा.”

अमृता फडणवीस यांची ही पोस्ट आणि हे गोड फोटोशूट सध्या सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आहे.

या पोस्टवर त्यांच्या चाहत्यांनीही आपआपल्या कन्येचे फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.