ITR Refund | आयटीआर रिफंड मिळण्यास उशीर का होतो? कारणे जाणून घ्या

ITR Refund

ITR Refund | इन्कम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) हा एक अर्ज आहे जो करदाता आयकर विभागाला उत्पन्न आणि कर माहिती प्रदान करण्यासाठी वापरतो. कोणत्याही करदात्यावरील कराचे मूल्यांकन त्याच्या उत्पन्नाच्या गणनेच्या आधारे केले जाते.

जर तुम्ही 31 जुलैपर्यंत आयकर रिटर्न भरले असेल आणि आयटीआर भरल्यानंतर रिफंड दाखवला असेल, तर ते एका विशिष्ट कालावधीत नोंदणीकृत खात्यात जमा केले जाते; परंतु काही लोकांना बराच वेळ होऊनही परतावा मिळत नाही, अशा स्थितीत काय करायचे असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. तुम्हालाही परतावा मिळाला नसल्यास, कृपया खालील मुद्दे लक्षात घ्या.

प्रथम, परताव्याबद्दल काळजी करण्याची गरज नाही. लक्षात ठेवा, जर तुम्ही आयटीआर भरताना किरकोळ चूक केली, तर आयकर विभाग आयटीआर रिफंडची प्रक्रिया करत नाही. त्यामुळे आयटीआर भरताना कुठे चूक झाली असावी, याचा अंदाज यावा. याशिवाय, इतर कारणे असू शकतात, ज्यामुळे परतावा मिळण्यास विलंब होऊ शकतो.

Maharashtra Drought | महाराष्ट्र सरकार अ‍ॅक्शन मोडवर, दुष्काळ निवारणासाठी मंत्रालयात उभारले ‘वॉर रूम’

रिफंड न मिळण्याची कारणे

ई-व्हेरिफिकेशन आवश्यक: इन्कम टॅक्स रिटर्न ई-व्हेरिफिकेशन असणे आवश्यक आहे. आत्तापर्यंत ई-व्हेरिफाइड न केल्यास, तुम्हाला रिफंड मिळू शकत नाही.

थकबाकी: मागील आर्थिक वर्षातील काही थकबाकी, कर भरणा असल्यास, परतावा मिळण्यास विलंब होऊ शकतो. कारण, आयकर विभाग रिफंडमध्ये तुमच्यावरील थकबाकी समायोजित करेल.

बँक खाते : तुमचे बचत खाते, चालू खाते सत्यापित करणे आवश्यक आहे. महत्त्वाचे म्हणजे एकच खाते आणि एकच पॅनकार्ड असावे. बँक खात्यात IFSC कोड देखील असावा. यानुसार आयटीआर रिफंड मिळविण्यासाठी मदत मिळू शकते आणि आयकर परतावा प्रक्रिया सहज होते.

इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे काय?

इन्कम टॅक्स रिटर्न हा एक प्रकारचा अर्ज आहे ज्यानुसार करदाता दरवर्षी आयकर विभागाकडे वार्षिक उत्पन्नाची माहिती सादर करतो. स्लॅबप्रमाणे कर भरतो. जर एखाद्या रिटर्नमध्ये असे दिसून आले की आर्थिक वर्षात अतिरिक्त कर भरला गेला आहे किंवा जास्त टीडीएस कापला गेला आहे, तर आयकर विभागाकडून परतावा जारी केला जातो.

प्राप्तिकर कायद्यानुसार, नियमित उत्पन्न मिळवणारी व्यक्ती किंवा कंपनी दरवर्षी आयटीआर भरणे आवश्यक आहे. पगार, व्यवसायातील नफा, मालमत्तेतील उत्पन्न किंवा लाभांश, भांडवली नफा, व्याज, इतर स्त्रोतांकडून मिळणाऱ्या उत्पन्नाचा अहवाल देण्यासाठी ITR भरणे अनिवार्य आहे. कोणत्याही व्यक्ती किंवा कंपनीला ठराविक तारखेच्या आत ITR दाखल करणे आवश्यक आहे. जर करदात्याने वेळेवर ITR भरला नाही तर त्याला दंड भरावा लागतो.

Read More 

Jan Dhan Yojna : पंतप्रधान जन धन योजनेला 9 वर्षे पूर्ण, रचला बॅंकिंग क्षेत्रात मोठा इतिहास, जाणून घ्या योजनेचे फायदे