डिव्हायडरवर झाडे का लावली जातात? केवळ प्रदूषणच नाही तर हे आहे मोठे ‘कारण’

डिव्हायडर

विशेष | कोणत्याही रस्त्यावर डिव्हायडरवर लहान रोपटे लावलेली दिसतील. प्रदूषण कमी करण्यासाठी ही छोटी झाडे लावली जातात असे आपल्याला कायम वाटत असते. मात्र ही झाडे लावण्यामागे आणखी एक मोठे कारण आहे, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. याचं नेमकं कारण काय आहे ते जाणून घेऊ या.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कोरावर बरेच लोक त्यांचे प्रश्न विचारत असतात. या प्रश्नांची उत्तरे देणारे बरेच लोक आहेत, जे लोकांना याबद्दल माहिती विविध ब्लॉग किंवा लेखांच्या माध्यमातून शेअर करत असतात, असाच एक प्रश्न नुकताच येथे विचारण्यात आला जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रस्ता तयार करताना मोठ्या प्रमाणात काँक्रीटचा किंवा गिट्टीचे वापर करून रस्ता तयार केला जातो. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरणे थांबते. ते कमी करण्यासाठी रुंद रस्ते मधोमध रिकामे करून, खड्डे खोदून त्यामध्ये झुडपे व झाडे लावली जातात. आपल्या सर्वांना माहित आहे की वनस्पतींचा नैसर्गिक हिरवा रंग डोळ्यांना आणि मेंदूला आलेला थकवा दूर करतात, त्यामुळे वाहन चालकांना आराम मिळतो. त्यामुळेच बहुतांश लांब पल्ल्याच्या महामार्गांवर रस्त्यांच्या मधोमध हिरवीगार झाडे लावली जातात.

महत्त्वाचे कारण म्हणजे अंधारात पलीकडून येणारे वाहन स्पष्टपणे समजणे सोपे नाही. समोरील वाहनाचा प्रकाश थेट चालकाच्या डोळ्यांवर पडला तर वाहन चालवणे कठीण होते. पण हाच प्रकाश झाडांवर पडल्याने वाहनचालकांच्या डोळ्यांना फार कमी नुकसान होते आणि मानसिक थकवाही कमी होतो. त्यामुळे अपघाताची शक्यता बऱ्याच अंशी कमी होते.

दुसरे महत्वाचे कारण म्हणजे महामार्गावर एवढी वाहने धावत असतात की, त्यातून उत्सर्जित होणाऱ्या कार्बन डायऑक्साईडमुळे संपूर्ण परिसरात प्रदूषण होते. पण रस्त्यांच्या मधोमध वाढणारी ही हिरवीगार झाडे कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात आणि ऑक्सिजन सोडतात. त्यामुळे प्रदूषण कमी होते. त्यामुळे जगात सर्वत्र झाडे लावली जातात. ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी देखील हे खूप प्रभावी आहे. दुसरे कारण तांत्रिक आहे. रस्त्याचे रुंदीकरण करायचे असल्यास छोटी झाडे-झुडपे केव्हाही काढता येतात.