Girish Mahajan | बारामतीसह सर्व 48 जागा जिंकू : गिरीश महाजन

win all 48 seats including Baramati : Girish Mahajan

बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघातून कोणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय भाजपची केंद्रीय निवडणूक समिती घेणार आहे. आता अजित पवारांसह त्यांचे 41 आमदार आमच्यासोबत आहेत. त्यामुळे आमची महाआघाडी बारामतीसह सर्व जागा जिंकेल.

नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधानपदी येतील आणि महाराष्ट्रात विरोधकांचा क्लीन बोल्ड होईल, असा विश्वास ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे. मी गेली 30 वर्षे आमदार आहे. अंदाज खरा ठरतो असेही ते म्हणाले.

ते बारामती विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते. त्यानंतर ते धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर उपोषण करणाऱ्यांची भेट घेण्यासाठी चौंडी (जामखेड) येथे रवाना झाले. यावेळी महाजन म्हणाले की, मराठा आरक्षण प्रश्नाला 40 दिवसांची मुदत आहे. त्याबद्दल न्या. शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील आयोग कार्यरत आहे. निर्धारित कालावधीत तपास पूर्ण करून त्यातून निश्चित मार्ग काढला जाईल, असे ते म्हणाले.

पंकजाताई आमच्या सोबत

भाजपमध्ये पंकजा मुंडे यांच्यावर अन्याय होत असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, विरोधकांकडून होत असलेल्या आरोपात तथ्य नाही. विरोधकांकडे आता करण्यासारखे काही राहिलेले नाही. त्यांनी आपल्या लोकांची काळजी घेतली पाहिजे. आता राष्ट्रवादीतील उरलेले लोक निघून जात आहेत.

राज्यात सुमार कामगिरी असलेल्या भाजप खासदारांचा पत्ता कट होणार? जे.पी.नड्डा आणि शहांनी घेतला निर्णय

उद्धव ठाकरेंची वाट बघायला कोणी तयार नाही. या उद्योगाचे विरोधक स्वतःचे सोडून दुसऱ्याच्या मागे का धावतात? हे कळत नाही. त्यांनी आपला पक्ष सांभाळावा. आम्ही आमचा पक्ष टिकवण्यास सक्षम आहोत. पंकजाताई आमच्या सोबत आहेत.

बावनकुळेंबाबत विपर्यास

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकाराबाबत केलेल्या वक्तव्यावर ते म्हणाले की, बावनकुळे यांच्यासह फडणवीस यांनी याप्रकरणी खुलासा केला आहे. त्यांच्या विधानाचा विपर्यास करण्यात आला. हा एक प्रकारचा अर्थाचा नाश आहे.

Read More

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीसाठी शेतकऱ्यांनी 30 सप्टेंबरपर्यंत केवायसी करावी