धक्कादायक घटना : प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणीवर दीड वर्ष बलात्‍कार

Rape crime

छत्रपती संभाजीनगर : प्रेमाच्या जाळ्यात अडकून एका तरुणीला दीड वर्षांपासून वारंवार शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याची घटना सिडको एन 7७ मध्ये उघडकीस आली आहे. सिडको पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीवरून तिच्या 29 वर्षीय प्रियकरावर बलात्कारासह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.

शाहीद हबीब शेख (29, रा. मिसारवाडी, कादरिया कॉलनी, छत्रपती संभाजीनगर) असे संशयिताचे नाव आहे. जानेवारी 2022 ते जून 2023 दरम्यान शाहिदने तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. तरुणी आणि शाहिद एकमेकांना ओळखतात.

त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले नंतर लग्नाचे आमिष दाखविले. प्रेम आणि भूलथापा देऊन आपण आता पती-पत्नी असल्याचे सांगून तिच्याशी अनेकवेळा बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. कालांतराने मुलगी त्याला नाकारू लागली. पण तरीही तो जबरदस्ती करत होता. अखेर वैतागून तिने सिडको पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी शाहिदविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.