Loksabha Election 2024 : तुमचे नाव मतदार यादीत आहे का? एका क्लिकमध्ये तपासा

your name in voter list? Check in one click

Loksabha Election 2024 : देशात अठराव्या लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. देशभरात 19 एप्रिल 2024 ते 1 जून 2024 या कालावधीत सात टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडेल, तर देशभरात 4 जून रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडेल, त्याच दिवशी निवडणूक निकाल जाहीर होतील. त्यामुळे आधी तुमचे नाव मतदार यादीत आहे की नाही ते तपासा, अन्यथा तुमचे नाव मतदार यादीत नसल्यास तुम्हाला मतदान करता येणार नाही.

महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे या पाच टप्प्यांत मतदान होणार आहे. निवडणुकीच्या काळात मतदार हा महत्त्वाचा घटक असतो. मतदारांनी दिलेल्या मतांच्या आधारे नेते निवडले जातात. निवडणुका जाहीर झाल्या की मतदार यादीही जाहीर केली जाते आणि ही मतदार यादी प्रत्येक वेळी बदलते. त्यामुळे मतदान करण्यापूर्वी प्रत्येकाने आपले नाव मतदार यादीत आहे का ते तपासावे.

2024 च्या मतदार यादीत तुमचे नाव का तपासायचे?

आता तुम्हाला वाटेल की मागच्या वेळी आमचं नाव मतदार यादीत होतं, मग पुन्हा तपासायची गरज काय? तर तुमच्या माहितीसाठी – मतदार याद्या प्रत्येक वेळी अद्ययावत केल्या जातात, प्रत्येक वेळी यादीत काही बदल केले जातात. काहीवेळा मतदार यादीतील तुमचे नाव चुकीचे असू शकते किंवा तुमचा पत्ता बदललेला असू शकतो.

काही वेळा तुमचे नाव चुकून वगळले जाऊ शकते, त्यामुळे खबरदारी म्हणून तुम्ही तुमचे नाव मतदार यादीत तपासावे, अन्यथा तुम्ही वेळेवर मतदान करू शकणार नाही. मतदार यादीतील तुमच्या तपशिलांमध्ये काही सुधारणा असल्यास, तुम्ही निवडणुकीच्या 10 दिवस आधी ते बदलू शकता.

मतदार यादीत तुमचं नाव कसं शोधाल?

  • तुम्ही ऑनलाईन पद्धतीने मतदार यादीत तुमचं नाव शोधू शकता. त्यासाठी सर्वप्रथम या लिंकवर क्लिक करा – https://voters.eci.gov.in/
  • वेबसाईटच्या मुखपृष्ठावरील ‘Search in Electoral Roll’ टॅबवर क्लिक करा.
  • आता वेबसाईटच्या वरच्या बाजूला तुम्हाला 3 पर्याय दिसतील. ‘Search by Details’, ‘Search by EPIC’, ‘Search by Mobile’ या पैकी एका पर्यायावर क्लिक करा.
  • आवश्यक माहिती (Basic Information) आणि कॅप्चा कोड सबमिट करा, यानंतर ‘Search’ वर क्लिक करा.
  • यानंतर आता खाली मतदार यादीतील तुमचं नाव, EPIC Number आणि सर्व माहिती दिसेल.
  • जर सर्च केल्यानंतरही तुम्हाला तुमचं नाव दिसत नसेल तर तुम्ही भरलेले तपशील एकदा तपासून पाहावे किंवा तीनपैकी इतर दोन पर्यायाचा वापर करावा. तरीही नाव न दिसल्यास राज्य निवडणूक कार्यालयाशी संपर्क साधा.